Petrol And Diesel Prices: सध्या दुचाकी, चारचाकीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विविध कंपन्या देखील नवनवीन फीचर्सच्या गाड्या ग्राहकांसाठी बाजारात घेऊन येत असतात. दुचाकी कुठेही सहज पार्क करता येते, तर चारचाकी मधून आरामदायी प्रवास होतो. म्हणूनच ग्राहक सुद्धा आपल्या सोयीप्रमाणे या गाडयांना पसंती दाखवताना दिसतात. यादरम्यान ग्राहकांचे लक्ष पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे सुद्धा असते. कारण – पेट्रोलची दरवाढ म्हणजे खिशाला कात्री, महिन्याच्या खर्चात वाढ आदी समस्या सामान्य नागरिकांसमोर येऊन उभ्या राहतात. तर आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणेसह इतर शहरांतील पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे जाणून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५६९१.०८
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८८९०.६४
बुलढाणा१०४.८८९१.४१
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.३२९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.८७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४३९०.९५
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.९४९०.४४
परभणी१०६.४१९२.८६
पुणे१०४.१४९०.६६
रायगड१०३.६९९०.२१
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.२२९१.७३

कोणत्या शहरांत कमी झाले पेट्रोल व डिझेलचे भाव?

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्रातील बीड, कोल्हापूर, यवतमाळ या शहरांत पेट्रोलची किंचित दरवाढ झाली आहे. तर गडचिरोली, नांदेड, पालघर, परभणी , रायगड, सांगलीमध्ये पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत. तर डिझेलच्या बुलढाणा शहरांत किंमतीत दरवाढ पाहायला मिळाली आहे आणि बीड, गोंदिया, लातूर, रायगड या शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल व डिझेलचे दर :

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दरवाढ, तर काही ठिकाणी किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.