राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल (१४ ऑगस्ट) रोजी ते दीड वर्षांनंतर घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडली असल्याने नवाब मलिक कोणत्या गटात जातात, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच आज (१५ ऑगस्ट) अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय चर्चा झाली, यावर प्रफुल्ल पटेलांनी आज माध्यमांना माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नवाब मलिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता आम्ही त्यांची भेट घेतली आहे. सोळा महिन्यानंतर वैद्यकीय कारणाने दोन महिन्यांचा जामीन त्यांना मिळाला आहे. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस आम्ही केली. पुढील उपचारांची माहिती घेतली. सात्वंनाकरता, आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्याकरता त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही”, असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेलांनी दिलं आहे.

हेही वाचा >> नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्याशी चर्चा झाली का? अजित पवार म्हणाले, “अटक झालेल्या व्यक्तिला…”

“ते आमचे सहकारी आहेत. २०-२५ वर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. अशा परिस्थितीत आमच्या मित्रांना भेटणं स्वाभाविक आहे. ते बारीक झाले आहेत, वजन कमी झालंय. त्यामळे माणुसकी म्हणून मित्रांना भेटायला गेलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही ते पुढे म्हणाले.

नवाबभाईंना राजकारणात आणू नये

राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. याबाबत प्रफुल्ल पटेलांना विचारलं असता ते म्हणाले की, “नवाबभाईंची प्रकृती सुधारणं महत्त्वाचं आहे. नवाबभाईंना सध्या या राजकारमात आणू नये. त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय राजकारणात आणू नये.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel met nawab malik what topic was discussed read in detail sgk