भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२’ अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव (ता. खटाव) या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. शासनामार्फत शाळेस ११ लाखांचे पारितोषिक मिळाले असल्याची माहिती प्राचार्य विजय गायकवाड यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण भागातील हुशार मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सप्टेंबर १९६६ मध्ये राज्य शासनाने संपूर्ण पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन सुरू केली. पुणे विभागातील पुसेगांव येथील ही शासनाची निवासी शाळा आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या शाळेने पुन्हा एकदा भौतिक व शैक्षणिक सुविधांचा दर्जा राखण्यात यश मिळवले आहे.

विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. त्याचा वापर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणार आहे. शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य विजय गायकवाड, गृहप्रमुख चंद्रकांत नरळे, कुलप्रमुख प्रकाश खेडकर, तसेच शासकीय विद्यानिकेतनचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशाला गवसणी घालण्यासाठी परिश्रम घेतले. या यशाबद्दल कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) शबनम मुजावर आदींनी अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pusegaon government vidyaniketan gets a prize of rs 11 lakhs zws