अलिबाग : खालापुर पोलीस ठाणे हद्दीत तीन डान्सबार रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाऊन कारवाई केली. या कारवाईत ३२ बारबालासह ४० आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.खालापुर पोलीस ठाणे हद्दीत डान्सबारमध्ये बारबाला अश्लील हावभाव, संगिताचे तालावर बीभत्स नृत्य करतात. या बारमध्ये बांगलादेशी व अल्पवयीन बारबाला आहेत माहितीत पोलिसांना मिळाली होती. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या बारवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे ३ पोलीस अधिकारी व २२ पोलीस अंमलदार, ६ महीला अंमलदार तसेच बांगलादेशी पथकाकडील १ पोलीस अधिकारी व १ महीला पोलीस अंमलदार यांची ३ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या तीन पथकांनी खालापुर पोलीस ठाणे हद्दीत समुद्रा बार, हॉटेल स्वागत बार व हॉटेल पुनम बार येथे छापे ताकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बारमध्ये मद्यप्राशन करत असलेल्या ग्राहकाबरोबर बारबाला संगिताचे तालावर अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना आढळुन आले. बारमधील कर्मचारी व ग्राहक त्यांना अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना प्रोत्साहित करीत होते. त्यामुळे खालापुर पोलीस ठाण्यात या तीनही बार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ३२ बारबालासह ४० आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे , पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस निरीक्षक रूपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, बांगलादेशी पथककातील पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जोशी, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार सचिन षेलार, पोलीस हवालदार रूपेश निगडे, पोलीस हवालदार विकास खैरनार, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार सुदिप पहेलकर, महिला पोलीस हवालदार अस्मिता म्हात्रे, महिला पोलीस हवालदार रेखा म्हात्रे, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री पाटील, महिला पोलीस हवालदार अर्चना पाटील, महिला पोलीस हवालदार झुलिता भोईर, पोलीस शिपाई तुशार कवळे, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे, पोलीस शिपाई ओंमकार सोंडकर, पोलीस शिपाई बाबासो पिंगळे, पोलीस शिपाई अक्षय जगताप, पोलीस शिपाई भरत तांदळे, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, पोलीस शिपाई सागर थळे, बांगलादेशी पथकातील महिला पोलीस हवालदार रसिका सुतार यांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad lcb raided three dance bars registering cases against 40 accused including 32 prostitutes sud 02