Saif Ali Khan Attacked in Mumbai : राहत्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून आत शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांची खंडणी मागत केलेल्या हल्ल्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले असून त्यापैकी दोन जखमा गंभीर होत्या. हल्ला केल्यानंतर पळून गेलेल्या तरुणाचा शोध चालू आहे. या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत. दरम्यान, सैफ अली खानवर गुरुवारी लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला अतिदक्षता विभागातून विशेष विभागात हालवण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला सैफवर हल्ला करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. पोलिसांची १० हून अधिक पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला, राज्यातील वाढती गुन्हेगारी, त्याचबरोबर आमदार, नेते व सेलिब्रेटींवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका दाव्याने खबळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला होऊन तो बचावला असला तरी हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमूर याला मारायचं होतं. तैमूरही या हल्ल्यातून बचावला आहे. सत्य कोणीच सांगणार नाही. सत्य सांगायला कोणी पुढे येणार नाही. तैमूरच्या नावामुळे त्याचा द्वेष केला जातो. समाजात एक विकृती पसरली आहे”.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर त्याच्या मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. सैफ व करीनाचा मुलगा तैमूर हा समाजमाध्यमांमध्ये व जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून, प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरबी भाषेत चांगला अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ असा तैमूरचा अर्थ आहे. त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचं लक्ष्य बनला होता. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे”.

आव्हाड म्हणाले, “सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attacked ncp sp mla jitendra awhad claims target was taimur asc