सातारा : सातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले. या बैठकीत सर्व उपस्थितांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार सीमोल्लंघनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, हे सीमोल्लंघन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याने सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक व शिवप्रेमी सुनील काटकर यांनी केले.
सातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले.
या बैठकीत मावळ्यांनी सोहळा अधिक आकर्षक व्हावा यासाठी विविध सूचना मांडल्या. शासन व संयोजन समितीने त्या सूचनांचे एकत्रिकरण करून कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली आहे. दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा पोवईनाका, सातारा व जलमंदिर येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या सीमोल्लंघन सोहळ्यास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काटकर यांनी केले.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर म्हणाले, उदयनराजे हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सीमोल्लंघन सोहळा बैठकीस शिवछत्रपती उदयनराजे मित्र समूहाचे कार्यकर्ते शिवप्रेमी, तसेच सातारकर बहुसंख्येने उपस्थित होते.