shahaji bapu patil statement on maharashtra karnatak border issue spb 94 | Loksatta

“पक्षाने आदेश द्यावा, मी बेळगावात घुसून…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं शहाजी बापूंचं विधान चर्चेत!

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे.

“पक्षाने आदेश द्यावा, मी बेळगावात घुसून…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबतचं शहाजी बापूंचं विधान चर्चेत!
शहाजी बापू पाटील ( संग्रहित)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अशातच महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना सांगोल्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा – “आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका

काय म्हणाले शहाजी बापू?

सांगोल्यात आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर शहाजी बापू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्याची परवानगी नाकारल्याबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना, “पक्षाने आदेश दिल्यास मी गमिनी काव्याने बेळगावात घुसून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून येईल आणि कोणाला कळूही देणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!

दरम्यान, सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती. या पार्श्वभूमीवर हे दोघे ३ डिंसेंबर रोजी बेळगावला जाणार होते. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा दौरा स्थगित करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकाराल पत्र लिहिले. “महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल गोष्ट नाही. त्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी आम्ही त्यांच्याशी आधीच संपर्क साधला आहे. पण तरीही ते बेळगावात आले तर कर्नाटक सरकारची पूर्वीची भूमिका कायम राहील,” असा इशारा बोम्मई यांनी दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:36 IST
Next Story
“हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची”, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल