विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे? अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा

याबाबत शिवसेनेकडून विधिमंडळ सचिवांना पत्रही देण्यात आले आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे? अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा
अंबादास दानवेंची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी चर्चा

गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, विधान परिषदेतील शिवसेना आमदारांचे संख्याबळ तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? मंत्र्यांची यादी फायनल झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

शिवसेनेकडून सचिवांना पत्र

शिवसेनेच्यावतीने याबाबत विधिमंडळ सचिवांना पत्र देण्यात आले आहे. यामध्ये विधानपरिदेच्या विरोधी पक्षनेते पदी आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा या पदावर दावा करू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीत या पदावरून चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “उद्या मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता, मात्र…”; अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

विधानपरिषदेतील शिवसेना आमदारांच्या संख्येवरुन निर्णय

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा आग्रह धरला होता. मात्र, हे पद राष्ट्रवादीकडे गेले आणि अजित पवारांची या पदावर निवड झाली. त्यानंतर आता किमान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद तरी आपल्याकडे यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु विधानपरिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका यावरुन विरोधी पक्षनेते पदाचा विचार केला जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी