अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली.Read More
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली.…