पुणे जिल्ह्याच्या दौंड येथे रविवारी (२२ ऑक्टोबर) विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील इतरही सदस्य उपस्थित होते. पक्षफुटीनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच अशाप्रकारे एका मंचावर उपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकाच मंचावरील उपस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सगळ्यानीच सगळ्यांशी बोललं पाहिजे. दडपशाहीमध्ये एकतर्फी संवाद केला जातो. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे चर्चा तर झालीच पाहिजे. चर्चा होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चर्चा न होणं, ही दडपशाही असते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा- “…तेव्हा आम्ही गप्प बसलो”, शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

दुसरीकडे, अजित पवार यांनी रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात एक सूचक टिप्पणी केली आहे. ‘शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा…’ हे विद्या प्रतिष्ठानचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यानुसारच आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर केली. या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी अजित पवारांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळून शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत संस्थेची प्रगती विषद केली. शरद पवार यांच्यासमोरच त्यांनी कर्मचाऱ्यांना दम देऊन चांगले काम करण्याच्या सूचनाही केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule reaction on sharad pawar and ajit pawar meeting in public event rmm