Suresh Dhas बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. यातले आरोपी पकडले गेले आहेत. तर एक आरोपी फरार आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह इतर पक्षातल्या लोकांनीही हे प्रकरण लावून धरलं आहे. तसंच वाल्मिक कराडला या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी होते आहे. दरम्यान आज सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा उल्लेख केला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले सुरेश धस?

२२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला. या खुनातील एकही आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही. या प्रकरणातले आरोपी सुशील या आकाच्या मुलाभोवती फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर मी त्यांची भेट घेऊन यासंदर्भातलं पत्र त्यांना देणार आहे. तसंच करुणा मुंडे यांच्याबाबतचं पत्रही तयार केलं आहे. गणेश मुंडे यांच्याबाबतचं पत्रही तयार आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत-सुरेश धस

सुरेश धस पुढे म्हणाले, परळीच्या तहसील कार्यालयाबाहेर महादेव मुंडे या तरुणाची हत्या झाली. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. ते आकाचा मुलगा सुशील याच्यासह फिरतात. संतोष देशमुखची हत्या सोडून इतर सगळ्या हत्या या परळीत झाल्या आहेत. परळीत यांचं गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे.

महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना पकडायचं नाही हे आकाने पोलिसांना सांगितलं-धस

महादेव मुंडेच्या हत्येबाबत सुरेश धस पुढे म्हणाले, महादेव मुंडेंची हत्या समोर आली तेव्हा त्यातले आरोपी कोण आहेत ते पण कळलं. पीआय सानप हे आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. पण आकाने सांगितलं त्यांना पकडायचं नाही. राजाभाऊ फड आणि आमच्या पक्षात नसलेल्या पाच जणांना आरोपी करा. त्यावर सानप म्हणाले की हे माझ्याकडून होणार नाही. ज्यावर आकाने त्यांना परळीतून जायला सांगितलं. त्यावर सानप यांनी मी निघून जातो असं सांगितलं होतं असाही दावा सुरेश धस यांनी केला.

महादेव मुंडे कोण होते?

महादेव दत्तात्रय मुंडे हे मूळचे परळी तालुक्यातील भोपळा या गावाचे रहिवासी होते. २०२२ च्या आसपास ते आंबेजोगाई या ठिकाणी राहण्यास आले. २०२३ मध्ये आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आली. त्याबाबतचा उल्लेख आता सुरेश धस यांनी केला आहे.