मराठा आरक्षणासाठी १७ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसंच सरकारवरही ताशेरे ओढले. तुमच्या हातात दोन दिवस आहेत, मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एक नवीन पिल्लु सकाळी आणलंय. तुम्ही वेडे समजता का आम्हाला? ईडब्ल्यूएस कोणी मागितलंय? कोणाला फायदा झाला आहे? सांगा एखादं नाव. मग कशाला आकडे मोडता? तुम्ही गणितशास्त्राचे मास्तर होता का?” असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांनी टीकास्र सोडलं.

हेही वाचा >> उरले फक्त दोन दिवस! मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री दगाफटका…”

“सतत सांगायला लागलेत की ईडब्ल्यूएसचा फायदा झाला. बाकींच्यानाही सारथीसारख्या संस्था आहेत हे सांगितलं का? ईडब्लूएस दाखवालयला लागलेत, तसंच इतरांनाही आरक्षण आहे. त्याची आकडेमोड केली का? नाही केली. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय की जाहिराती छापायला पैसे आमचे, अर्धा कॉलम छापून आणणार ते आणि आम्हाला सांगणार काय फायदा झाला?” असंही जरांगे पाटील म्हणाल.

तसंच, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने वेळकाढूपणा करू नये. सरकारने १ महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government has now released a new thought manoj jarange patil taunt against ews said sgk