उद्धव ठाकरे हे दिसतात तसे नाहीत. एक चेहरेपे कहीं चेहरे लगा लेते हैं लोग असा तो माणूस आहे. त्यांच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका असं म्हणत आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. कोल्हापूरच्या महाअधिवेशनात त्यांनी ही टीका केली. इतकंच नाही तर २०१९ च्या महाविकास आघाडीचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंनी खडे बोल सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“२०१९ ला तुम्ही लग्न एकाबरोबर केलंत, संसार दुसऱ्याबरोबर आणि हनिमून तिसऱ्याबरोबर साजरा केलात. मी असंसदीय बोलत नाही. पण तुम्ही जनतेला आणि शिवसैनिकांना फसवलं. पंतप्रधान मोदींची फसवणूक केली. महाराष्ट्राची फसवणूक केली. एका खुर्चीच्या मोहापायी तुम्ही सगळं गमावलंत. मग बेईमानी आणि विश्वासघात कुणी केला? तुम्ही तेव्हाही बेईमानी केलीत आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुमच्या कुटुंबाच्या मागे तेव्हा काही कृत्यं तुम्ही केलीत. नरेंद्र मोदींना भेटलात तेव्हा तुम्हाला घाम आला होता. तेव्हा युती करु सांगितलं होतं. पण तेव्हाही तुम्ही त्यांना फसवलं आहेत. मग आमच्यावर कसे काय आरोप करता? आम्हाला गद्दार म्हणू शकता? आम्ही ते केलेलं नाही. “

हे पण वाचा- “मातोश्रीतून बाळासाहेबांची डरकाळी ऐकू यायची तिथून आता रडगाणी आणि…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

वारसा सांगणाऱ्यांनी आरसा बघावा

आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवला. जेवढा खड्डा आमच्यासाठी खोदाल, तेवढे खड्ड्यात जाल. मी चॅनलवाल्यांनाही सांगेन आमचं अधिवेशनही दाखवा की शेवटच्या खुर्चीपर्यंत दाखवा सगळ्या भरल्या आहेत. वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा पाहिला पाहिजे. स्वतःची कर्तृत्व आरशात बघावीत. काहीही लपून राहात नाही. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केली आहे.

शिवसेना कुणाची हे सांगायची गरजच नाही

आज शिवसेना आपण ताकदीने उभी करतो आहोत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपतो आहे. आज मला समाधानही आहे की शिवसेना पक्ष पुढे जातो आहे आणि मोठा होतो आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते हे मी कायमच सांगत होतो. त्यामुळेच आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्यबाणही मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे तसाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादही आपल्या पाठिशी आहे. आज जी काही गर्दी झाली आहे त्यामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

आपल्या पक्षाची ताकद वाढते आहे

आपण अधिवेशनात शेतकऱ्यांचे, गरजूंचे ठराव घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी हिंदूंचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आपण त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर केला. आज आपण पाहतो आहोत जर बाळासाहेब ठाकरे असते तर राम मंदिर होताना, ३७० कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनी मोदींचं मुक्त कंठाने स्वागत केलं असतं आणि अभिनंदन केलं असतं. जे वारसा सांगतात त्यांनी एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही. बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्व हे सांगण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला (उद्धव ठाकरे) नाही. ५० आमदार, १३ खासदार हे आपल्याकडे आहेत. नीलमताई आपल्याकडे आल्या आहेत. कितीतरी आमदार आपल्याकडे म्हणजेच शिवसेनेत आले आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, जिल्हापरिषद आणि हजारो-लाखो शिवसैनिक का येत आहेत? असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who talk about bal thackeray legacy should first look at the mirror said eknath shinde to uddhav thackery scj
First published on: 17-02-2024 at 15:58 IST