लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोणारे परिसरात सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतील गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. सात तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला निघाले. दीड हजार एसटीच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली. लोणेरे येथे उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे येथील वाहतूक सर्विस रोडवरून केली जात आहे. यामुळे येथील रस्ता अरुंद बनला आहे. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने या ठिकाणी पहाटेपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

आणखी वाचा-लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक

बेशिस्त वाहन चालक यांची शिस्त पाळत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडली होती. कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही मार्गीकेवर कोकणात जाणाऱ्या गाड्या आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पोलीस प्रवासी यांनी प्रयत्न करूनही या ठिकाणची वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही.

मुंबईतुन तळ कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

  • मुंबई गोवा महामार्ग (मुंबई- नवीमुंबई-पनवेल-महाड)
  • मुंबई- वाशी- पामबीच- उरणफाटा- खारपाडा- वडखळ-महाड
  • मुंबई पुणे दृतगती मार्ग(मुंबई- खालापुर- पेण- महाड)
  • मुंबई पुणे दृतगती मार्ग( मुंबई-खालापुर- पाली- वाकण- माणगाव- महाड)
  • मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळुण)
  • मुंबई पुणे दृतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापुर- राधानगरी मार्गे कणकवली)
  • मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापुर- आंबोली मार्गे सावंतवाडी)
  • मुबईतून अटल सेतू मार्गे पळस्पे येथून मुंबई गोवा महामार्ग

आणखी वाचा-ST Employee Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; सरकारकडून पगारात साडे सहा हजारांची वाढ

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती. ६०० हून अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान महामार्गावर ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही लोणारे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोटर सायकल पेट्रोलिंगचे केले होते. माणगाव आणि इंदापूर येथे एसटीच्या बसेस मुळे दरवर्षी होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील बस स्थानक तात्पुरते स्वरूपात शहरा बाहेर हलवण्यात आली होती. वाहतूक कोंडी वर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात ठेवण्यात आले होते. मात्र तरीही लोणारे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचा पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on mumbai goa highway people going to konkan got stuck near lonere mrj