uday samant react on gujarat election result narendra modi ssa 97 | Loksatta

गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; उदय सामंत म्हणाले, “मोदींसमोर कोणी…”

“देशातील प्रत्येक निवडणुकीत…”, असेही सामंत म्हणाले.

गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; उदय सामंत म्हणाले, “मोदींसमोर कोणी…”
उदय सामंत नरेंद्र मोदी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपाने गुरुवारी ऐतिहासिक यश संपादन केलं. सलग सातव्यांदा विक्रमी विजय साकारणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या काँग्रेसला भुईसपाट केलं. तसेच, पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या आम आमदी पक्षाला एक आकडी जागांवर रोखलं.

गुजरातमध्ये भाजपाला १५६ जागा मिळाल्या. गेल्यावेळी ७७ जागा जिंकलेल्या काँग्रेसला १७ जागांवर समाधान मानाव लागलं आहे. ‘आप’ला ५ जागांसह खाते उघडता आले तरी चमकदार कामगिरी करता आली नाही. गुजरात निवडणूक निकालावर आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट झालं की, कोणी कितीही नवा चेहरा आणला, तरी मोदींसमोर कोणी तग धरू शकणार नाही. देशातील प्रत्येक निवडणुकीत हेच होणार आहे. तसेच, २०२४ साली सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदीच असतील, हेच कालच्या निवडणुकीवरून दिसलं.”

हेही वाचा : “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचा मिटकरींकडून समाचार; म्हणाले, “तुम्ही मंत्रीपदासाठी…”

सीमाप्रश्नाबाबत शिंदे सरकारकडून कोणताही प्रयत्न केला जात नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यासंदर्भात बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं, “विरोधकांच्या सांगण्यात काही तथ्य नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच, पुन्हा कर्नाटकात हिंसक घटना घडणार नाही. घडल्या तर गुन्हा दाखल करून, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहेत. लवकरच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री भेटणार आहेत,” असेही सामंत यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 21:04 IST
Next Story
“…तर मग हिमाचल आणि दिल्लीत मोदींमुळेच पराभव झाल्याचं मान्य करा” – अंबादास दानवेंनी लगावला टोला!