मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. अखेर गुरुवारी (१६ मार्च) ही सुनावणी संपली आहे. या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांवर विविध प्रश्नांचा भडिमार केला. यामुळे सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल मोठं विधान केलं. शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात लगबग सुरू आहे. आमच्या लोकांनी सांगितलं की मंत्रालयातील लगबग फारच वाढली आहे. जुन्या फाईल्स पटापट काढल्या जात आहेत. त्यावरुन असं वाटतंय की त्यांना (सत्ताधाऱ्यांना) काहीतरी निकालाबाबत चाहूल लागली आहे. एखादं सरकार जेव्हा जातं तेव्हा अशी लगबग दिसते. आम्ही आता न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतोय. ”

हेही वाचा- “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

नाना पटोलेंच्या विधानानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. नाना पटोलेंच्या विधानाबाबत विचारलं असताना उदय सामंत म्हणाले, “नाना पटोलेंनी हे बोललंच पाहिजे. कारण ते विरोधी गटातील एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. उद्या ते जर एकनाथ शिंदेंचं कौतुक करायला लागले. तर तेदेखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत की काय? असा एक संशय निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी हे बोलणं योग्य आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant reaction on nana patole statement about supreme court verdict and shinde fadnavis govt rmm