सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एकाचवेळी कमाल दोन मतदारसंघात उभे राहण्याची मर्यादा असताना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केलेले कर्नाटकातील दीपक कटकधोंड ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामीजी यांनी सोलापूरशिवाय अमरावती आणि नागपूरमध्येही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यकटेश्वरा महास्वामीजींनी सोलापूरसह अमरावती आणि नागपूरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच कर्नाटकातील विजयपुरातही त्यांनी उमेदवारी भरल्याची माहिती समोर आली आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. एका उमेदवाराला जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची कायदेशीर मुभा आहे. परंतु व्यकंटेश्वरा महास्वामीजी हे तीन मतदारसंघांतून उभे आहेत. शिवाय कर्नाटकात विजयपूर राखीव मतदारसंघातही त्यांची उमेदवारी रिंगणात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याची पडणळणी केली जात आहे. जर ती खरी असेल तर एकाचवेळी चार मतदारसंघांतून व्यंकटेश्वरा महास्वामी यांची उमेदवारी असल्याचे स्पष्ट होईल. व्यंकटेश्वरा महास्वामीजी हे शेजारच्या कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील मूळ राहणारे आहेत. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीतही त्यांची अपक्ष उमेदवारी होती.  त्यांना अत्यल्प मते मिळून त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkateswara mahaswami who has stood on three lok sabha seats is in trouble amy