कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने मोडून काढला. तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी काल दिली.

(बातमी अपडेट केली जात आहे.)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut arrested for barsu refinery protest thackeray group asc