RSS च्या मुख्यालयावर मोर्चा नेल्याने पोलीस कारवाई, वामन मेश्राम म्हणाले, "लाखो लोकांनी..." | Waman Meshram comment on protest against RSS in Nagpur | Loksatta

RSS च्या मुख्यालयावर मोर्चा नेल्याने पोलीस कारवाई, वामन मेश्राम म्हणाले, “लाखो लोकांनी…”

नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

RSS च्या मुख्यालयावर मोर्चा नेल्याने पोलीस कारवाई, वामन मेश्राम म्हणाले, “लाखो लोकांनी…”
मोहन भागवत, वामन मेश्राम

नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर वामन मेश्राम यांनी नागपूरमधील आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो, अशी घोषणा मेश्राम यांनी केली. तसेच सर्व आंदोलकांनी परत जावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असं आवाहन केलं. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) नागपूरमध्ये बोलत होते.

वामन मेश्राम म्हणाले, “मोर्चा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर जाण्याचा किंवा सभा घेण्याचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा होता कामा नये. देशभरातून आलेल्या लाखो लोकांनी आपआपल्या वाहनांकडे जावं. प्रशासनानेही त्यांना सहकार्य करावं. आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांतता राखण्यासाठी मदत करावी.”

“कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा अवलंब करू नये”

“लाखोंच्या संख्येने लोक नागपूरमध्ये आले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व लोकांनी काम केलं पाहिजे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करता कामा नये. आम्ही हिंसेच्या बाजूने नाही. १४ ऑक्टोबरपासून सुरू केलेला चार टप्प्यातील कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे,” असं आवाहन वामन मेश्राम यांनी केलं.

आंदोलन कशासाठी?

संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत भारत मुक्ती मोर्चाने आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही.

हेही वाचा : अग्रलेख : याची दखल घ्या!

पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांना इंदौरी चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिवसेनेतील महिला नेत्याने पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर, म्हणाल्या…

संबंधित बातम्या

“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला- शिवेंद्रसिंहराजे भोसले
“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य
“काहीतरी काय? हे बाहेर पडले…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला दिलं खोचक प्रत्युत्तर!
“असं वक्तव्य करायला यांची जीभ कशी वळते?” ; मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा
“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे: पाणीटंचाईची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; स्थानिक स्वराज्य संस्थांना १३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश
राहुल, अय्यर, पंत एकाचवेळी खेळू शकतात? बांगलादेश दौऱ्याआधी माजी निवडसमिती सदस्याचे मोठे विधान