पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अगोदर आपली कुवत आणि उंची काय हे सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील यानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. लोकसभा निवडणुकीत राजकारण सोडण्याचे दिलेले आव्हान गृहमंत्री पाटील यांनी स्वीकारले नसल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही, भाजपाची कोअर कमिटी याबाबत निर्णय घेणार असून घटक पक्षांना काही जागा द्याव्या लागणार आहेत. भाजपा आपले उमेदवार निश्चित करीत असताना स्थानिक पातळीवरून आलेल्या अहवालावर निर्णय घेईल.
जिल्ह्यात असणाऱ्या आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळाले असून हे ताकद वाढली असल्याचेच लक्षण आहे. येत्या निवडणुकीतही महायुतीला अनुकूल वातावरण असून जिल्ह्यातील काही नेत्यांचा पक्षप्रवेश जागावाटपानंतर होण्याच्या शक्यतेला खा. पाटील यांनी मौन पाळून बगल दिली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2014 रोजी प्रकाशित
मोदींवर टीका करणाऱ्या आर. आर. यांची कुवत काय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अगोदर आपली कुवत आणि उंची काय हे सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील यानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-07-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is capability to r r patil