“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना चारही राज्यांच्या निकालाबाबत भाष्य केलं. तसंच, भाजपाचा उल्लेख करत राज्यातील राजकीय परिस्थितीवरही टिप्पणी केली. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं”, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला.

हेही वाचा >> “…तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व शिंदे गटाची होईल”, रोहित पवारांचा टोला; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले…

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर काय?

“रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं, भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबांसमोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडतोय, भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते? आता हा तळतळाट कशासाठी?” असं अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालात तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदींचाच वरचष्मा राहिल असं सत्ताधारी म्हणत आहेत. तसंच, विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was the first to take the initiative to go with the bjp amol mitkari direct question to rohit pawar sgk