एका २२ वर्षीय विद्यार्थिनीने तिचं कौमार्य विकल्याची बातमी समोर आली आहे. या विद्यार्थिनीचं तिचं नाव लॉरा आहे. लॉराने तिच्या कौमार्याचा ऑनलाइन लिलाव केला. यूके, मँचेस्टरमधील या तरुणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे; कारण तिने तिचं कौमार्य तब्बल १८ कोटी रुपयांमध्ये विकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एस्कॉर्ट एजन्सीच्या एका प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेल्या या लिलावामध्ये राजकारणी, बिझनेस टायकून आणि सेलिब्रिटी लोक सहभागी झाले होते. लॉराचे कौमार्य एका हॉलीवूड स्टारने तब्बल १८ कोटी रुपये देऊन विकत घेतले, अशी माहिती समोर आली आहे.

लॉराने सांगितलं की तिला तिच्या करिअरसाठी हे पैसे वापरायचे आहे. तिला तिच्या या निर्णयावर कोणताही पश्चाताप नसल्याचं लॉरा म्हणाली. आपल्या करिअरसाठी कौमार्य विकण्याचा हा योग्य निर्णय आहे. अनेक महिला आपलं कौमार्य गमावतात आणि त्यांना त्यातून काही फायदा होत नाही, त्याउलट आपण आपल्या फायद्यासाठी कौमार्य विकत असल्याच तिने सांगितलं. यासंदर्भात हिंदुस्थान टाइम्सने वृत्त दिले आहे.

काय म्हणाली लॉरा?

लॉरा म्हणाली, “मी खूश आहे. मला कोणताही पश्चाताप नाही. अनेक मुली त्यांचं कौमार्य गमावतात आणि त्याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. निदान मी माझे भविष्य सुरक्षित केलंय.” देशातील श्रीमंत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका प्रसिद्ध एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. एका हॉलीवूड सेलिब्रिटीने लॉराचं कौमार्य विकत घेतलं आहे. पण त्याचबरोबर तिला अनेक राजकीय नेते आणि उद्योजकांकडून ऑफर आल्या होत्या, असं लॉराने सांगितलंय.

लॉराने या हॉलीवूड स्टारबरोबर करार केला आहे. त्यानंतर तिने तिच्या कौमार्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी देखील केली आहे. लॉराने तिचं कौमार्य विकल्याचा खुलासा स्वतः केला आहे. मात्र संबंधित वेबसाइटने लॉराचे कौमार्य विकत घेणाऱ्या हॉलीवूड स्टारबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या लिलावात सहभागी झालेल्या लोकांची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 year old student sold virginity for crore to hollywood star hrc