‘धूम’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये ‘चोर’च भाव खाऊन जातो आणि चित्रपटात तोच हिरो ठरतो. अत्तापर्यंत जॉन अब्राहम (धूम-१), हृतिक रोशन (धूम-२) आणि आता ‘धूम ३’ मध्ये आमिर खानने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. असे असले तरी ‘धूम’ चित्रपटाच्या आगमी भागात शाहरुख खान उत्तम कामगिरी करू शकेल असे आमिर खानला वाटते.
आमिरला ‘धूम’च्या तिसऱ्या भागासाठी करारबद्ध केल्यानंतर आता ‘यश राज फिल्मस्’ ‘धूम’ मालिकेतील आगामी चित्रपटासाठी सलमान खान आणि शाहरुख खानचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमिवर आमिरने आपले हे मत जाहीर केले. असे असले तरी या वृत्ताचा अधिकृत खुलासा चित्रपटकर्त्यांकडून करण्यात आलेला नाही.
या विषयावर वार्ताहरांशी बोलताना आमिर म्हणाला, जर आगामी ‘धूम’साठी शाहरुख खान योग्य असल्याचे आदित्य चोप्राला वाटत असेल, तर ही चांगली गोष्ट आहे. तो चांगले काम करेल याची मला खात्री आहे… खलनायक म्हणून तो चांगली कामगिरी करू शकतो.
चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरच्या सुरवातीच्या काळात ‘डर’, ‘बाजीगर’ आणि ‘अनजाम’ सारख्या चित्रपटांतून खलनायकी भूमिका केलेल्या शाहरुख खानने देखील पुन्हा एकदा खलनायकी प्रकारातील भूमिका कराण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2013 रोजी प्रकाशित
आगामी ‘धूम’ चित्रपटात शाहरुख खान उत्तम काम करू शकतो – आमिर खान
'धूम' चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये 'चोर'च भाव खाऊन जातो आणि चित्रपटात तोच हिरो ठरतो. अत्तापर्यंत जॉन अब्राहम (धूम-१), हृतिक रोशन (धूम-२) आणि आता 'धूम ३' मध्ये आमिर खान...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-12-2013 at 05:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan i feel shah rukh khan will do a great job in next dhoom franchise