Anu Aggarwal Durga Puja Video Viral :अनु अग्रवाल आता इंडस्ट्रीपासून दूर असली तरी १९९० चा सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ने तिला रातोरात स्टार बनवलं होतं. पण, एका अपघाताने तिचं सर्वस्व हिरावून घेतलं. अनु अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

अलीकडेच अनु अग्रवाल काजोल आणि राणी मुखर्जीच्या दुर्गा पूजा मंडपामध्ये दिसली. यावेळी तिची अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनुचा यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावर लोकांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.

अनु अग्रवाल अलीकडेच दुर्गा पूजा मंडपामध्ये दिसली. तिने लाल साडी नेसली होती आणि दागिने घातले होते, जे तिच्या लूकला अगदी शोभणारे होते. तिने हसून पापाराझींसाठी पोज दिली. पण, तिचे चाहते तिचे हावभाव पाहून आश्चर्यचकित झाले.

अनु अग्रवालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “एकेकाळी या खूप प्रसिद्ध होत्या, पण आता सगळं संपलं.” दुसऱ्याने कमेंट केली की, “अनु अग्रवाल ९० च्या दशकातील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या.” तिसऱ्याने लिहिले की, “वेळेनुसार सगळं बदलतं.” एकाने म्हटले की, “त्या तेव्हा खूप सध्या आणि निरागस होत्या.”

‘आशिकी’ नंतर अनु अग्रवालला चित्रपटांच्या खूप ऑफर्स आल्या, परंतु एका अपघाताने सर्व काही उद्ध्वस्त झाले. १९९६ मध्ये ती अचानक गायब झाली. एका भयानक अपघातामुळे तिची स्मृती गेली आणि चेहरा खराब झाला आणि जवळजवळ एक महिना ती कोमात होती. ती वाचली, पण तिचे करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले. या अपघाताने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. यानंतर ती चित्रपट आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर गेली.

‘आशिकी’मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. या सिनेमानंतर अनु अग्रवाल ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘आशिकी’ सिनेमानंतर तिने ‘गजब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.