Entertainment News Today, 19 May 2025 : बॉलीवूड अभिनेता अभय देओल हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभयचे खूप चाहते आहेत. अभय बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तो शेवटचा ‘ट्रायल बाय फायर’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. काम नसल्यामुळे अभय देओल डीजे झाला आहे, असं नाईट क्लबमधील त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं जातंय.

अभय देओलने बॉलीवूडमध्ये मोजक्याच पण उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभय बऱ्याच काळापासून बेरोजगार आहे, म्हणून पैसे कमवण्यासाठी तो डीजे बनला आहे, अशा चर्चा होत आहे. अभयचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा गुडगावमधील एका नाईट क्लबचा आहे. ज्यामध्ये अभय डीजे म्हणून दिसतोय. अभयचा हा अंदाज पाहून चाहते खूप खूश आहेत. त्याच्या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

11:38 (IST) 19 May 2025

“पप्पा नका ना जाऊ!” शेवटच्या क्षणी लेकाने केलेली विनवणी, पण थांबता आलं नाही; मुलाच्या मृत्यूबद्दल अभिनेत्याने सांगितली दु:खद आठवण

प्रसिद्ध ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने लेक आयुषच्या निधनानंतर घरातील देवाच्या मूर्त्या दिलेल्या फेकून, त्या घटनेबद्दल म्हणाला… …सविस्तर वाचा
11:30 (IST) 19 May 2025

“मला आजपर्यंत ‘आशिकी’चं पूर्ण मानधन मिळालं नाही”, अनु अग्रवालचा ३५ वर्षांनंतर खुलासा, म्हणाली, “ही माझ्याकडून…”

‘आशिकी’ या चित्रपटामुळे अनु अग्रवालला अनेक बॉलीवूड चित्रपट मिळाले. …सविस्तर बातमी
11:10 (IST) 19 May 2025

“…तर मी त्यांच्यावर हात उचलेन”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट करण्यास दिला होता नकार, मात्र सासूबाईंमुळे…; अभिनेता खुलासा करत म्हणाला…

दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्यामुळे सुनील शेट्टीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता …सविस्तर बातमी
09:35 (IST) 19 May 2025

“आम्ही त्या दोघांना एकत्र…”, अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Sidharth Malhotra and Kiara Advani Love Story : सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काश्मीरमध्ये शूटिंग करण्याबद्दल हिमांशू मल्होत्रा काय म्हणाला? …वाचा सविस्तर
09:34 (IST) 19 May 2025

अभय देओल झाला डीजे?

अभय बऱ्याच काळापासून बेरोजगार आहे, म्हणून पैसे कमवण्यासाठी तो डीजे बनला आहे, अशा चर्चा होत आहे. अभयचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा गुडगावमधील एका नाईट क्लबचा आहे.

अभय देओल (फोटो – इन्स्टाग्राम)

काम नसल्यामुळे अभय देओल डीजे झाला आहे, असं नाईट क्लबमधील त्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं जातंय.