"सत्ता बळकावणार्‍याला नाही तर...", अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया | Actor Kiran Mane Reaction on CM Uddhav thackeray speech on Eknath Shinde nrp 97 | Loksatta

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – अभिनेते किरण माने

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून अनेकांनी त्यावर भावूक प्रतिक्रिया दिली. नुकतंच या भाषणावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर, विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही बंड केलं की…”, अभिनेता हेमंत ढोमेचे ‘ते’ ट्विट चर्चेत

“अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो”, असे किरण माने यांनी लिहिले आहे.

आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं : एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Sushant Singh Rajput Drugs Case : रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, NCB कडून खटला दाखल

संबंधित बातम्या

‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
आजही मराठी कलाकार ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत- डॉ. अमोल कोल्हे
Review : आनंदी, सुंदर वैवाहिक आयुष्यासाठी; ‘आणि काय हवं?’
Akshaya Hardeek Wedding: अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न
Oscars 2017: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाचा सहभाग नाही!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू