अभिनेता महेश बाबू याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जाते. अभिनेता महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणेतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबू यांची आई वृद्धपकाळामुळे अनेक आजारांशी झुंज देत होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (२८ सप्टेंबर) सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी वाचा : सुपरस्टार महेश बाबू यांचे मोठे भाऊ चित्रपट निर्माते रमेश बाबू यांचे निधन

महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे पार्थिव पद्मालय स्टुडिओमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत या ठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. महेश बाबू यांच्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.

सतीश रेड्डी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर महेश बाबू यांच्या आई इंदिरा देवी यांच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली आहे. महेश बाबूच्या आईच्या निधनाची माहिती देताना सतीश रेड्डी म्हणाले, सुपरस्टार महेश बाबू यांच्या आई इंदिरा गुरु यांचे निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवदेना व्यक्त करतो.

आणखी वाचा : ‘महेश बाबू मराठीमध्ये बोलू शकतो का?’ नम्रता शिरोडकर म्हणाली…

महेश बाबू यांच्या आईच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. “श्रीमती इंदिरा देवी यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून फार दुःख झाले. देवी माता त्यांच्या आत्म्याला शांती देवो. मी सुपरस्टार कृष्णा, भाऊ महेश यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत करतो.” असे ट्वीट मेगास्टार चिरंजीवी यांनी केले आहे.

आणखी वाचा : ‘बॉलिवूडला मी परवडणार नाही’ असे म्हणणारा अभिनेता महेश बाबू एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या

दरम्यान महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरे लग्न केले होते. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंदिरा देवी या एकट्याच राहत होत्या. पण महेश बाबू आणि इतर कुटुंबीय त्यांच्याकडे वारंवार जात-येत असत. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांची आई इंदिरा देवी सहभागी व्हायच्या. त्यांच्या फार घट्ट नाते होते. महेश बाबू हे कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचे चौथे अपत्य आहेत. महेश बाबू यांचे भाऊ रमेश बाबू यांचेही यंदाचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mahesh babu mother indira devi passes away in hyderabad nrp