Actor Ranjith says honor killing is not violence : देशात अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच अशी दुर्दैवी घटना घडली होती. अशातच आता तमिळ अभिनेता व दिग्दर्शक रणजितने ऑनर किलिंगसंदर्भात मोठं विधान केलं आहे. ९ ऑगस्ट रोजी तामिळनाडूतील सेलममध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की जातीवर आधारित ऑनर किलिंग म्हणजे हिंसा नाही. पालकांना मुलांची काळजी असते आणि ती काळजी व्यक्त करण्यासाठी ते ऑनर किलिंग करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणजितचा ‘कवुंदमपलायलम’ हा ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तो सालेमच्या प्रेक्षकांबरोबर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. करुपूरमधील एका थिएटरबाहेर त्याला ऑनर किलिंगबद्दल विचारण्यात आलं. ऑनर किलिंगसारख्या हिंस्र कृत्याचे समर्थन करत तो म्हणाला, “फक्त आई-वडिलांनाच त्या वेदना कळतात. जर आपली बाईक चोरीला गेली असेल तर ती कुठे गेली, कोणी नेली हे आपण जाऊन पाहतोच ना? मग ज्या पालकांसाठी त्यांची मुलंच त्यांचं आयुष्य आहेत, त्यांनी असं काही केल्यावर ते त्यांच्यावर चिडतात किंवा राग व्यक्त करतात. ही हिंसा नाही, ती फक्त त्यांच्याबद्दल असलेली काळजी आहे.”

दाक्षिणात्य चित्रपट आवडतात, मग तुम्ही बघितलेत का हे सस्पेन्स-थ्रिलर सिनेमे? OTTवर आहेत उपलब्ध

देशात अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. अशातच रणजितने केलेल्या या विधानाने खळबळ उडाली आहे. एकीकडे ऑनर किलिंगसाठी नवीन कायदा आणला जावा, अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे हा अभिनेता ऑनर किलिंगचे समर्थन करत तो हिंसा नसल्याचं म्हणत आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेने याबद्दल वृत्त दिले आहे.

सोभिताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच समांथाच्या चाहत्यांनी केलं ट्रोल; नागा चैतन्यला म्हणाले, “इतक्या लवकर आयुष्यात…”

रणजीतचा शुक्रवारी रिलीज झालेला ‘कवुंदमपलायलम’ हा चित्रपट जाती-आधारित हिंसेवर आधारित आहे. हा चित्रपट राज्यात मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ranjith says honour killing is not violence its care about children hrc