"तुमच्या घरची लक्ष्मी चालली सोडून…" श्रेयस तळपदेच्या बहुचर्चित 'आपडी थापडी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित | Actor Shreyas Talpade Mukta Barve Sandeep Pathak Aapadi Thaapdi movie trailer release nrp 97 | Loksatta

“तुमच्या घरची लक्ष्मी चालली सोडून…” श्रेयस तळपदेच्या बहुचर्चित ‘आपडी थापडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

“तुमच्या घरची लक्ष्मी चालली सोडून…” श्रेयस तळपदेच्या बहुचर्चित ‘आपडी थापडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता श्रेयस तळपदे हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आपडी थापडी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच हा चित्रपट मनोरंजक असल्याचं कळत आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रटाचा सहकुटुंब आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी यांच्यातील एका पैशासंबंधी संवादाने होते. अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आणि त्यानंतर उडणारी धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला १० हजारांहून अधिक व्ह्यूज आल्याचे पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे हे कलाकार पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “रेखाजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या…” विशाखा सुभेदारने सांगितला ‘तो’ अनुभव

आपडी थापडी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती के सायलेंटच्या केसी पांडे यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांनी केले आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे, अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली जाणार आहे.

यात सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, दमदार कथा आणि तांत्रिकदृष्ट्याही परिपूर्ण असलेला हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मध्यरात्री दारूच्या नशेमध्ये सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला अन्…; ‘त्या’ एका घटनेमुळे अभिनेत्रीला झाला होता मनस्ताप

संबंधित बातम्या

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफची अनेक वर्षांनी झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
२५ वर्षांपूर्वीचा ‘तो’ वादग्रस्त न्यूड फोटो पुन्हा शेअर करत मिलिंद सोमण म्हणाला..
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Optical Illusion: ‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? ५ की ३? अचूक उत्तर देणारा ठरेल जिनियस
पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन
मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार
महिमा चौधरीची मुलगीही करणार बॉलिवूड पदार्पण? अरियाना म्हणाली, “माझ्या आईला…”
पुणे : जीएंच्या जन्मशताब्दीनिमित्त ११ डिसेंबरपासून दोन दिवसीय साहित्यिक कार्यक्रम