-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमेय वाघला ओळखले जाते. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
-
तसेच तो नेहमी विविध विषयांवर पोस्ट शेअर करत असतो. सध्या मात्र अमेय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
-
अमेयने नुकतंच केलेल्या एका नव्या पोस्टमुळे सगळ्यांनाच गोंधळात टाकलं आहे. त्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
-
अभिनेता अमेय वाघने काल (२५ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने “जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी”, अशी पोस्ट केली होती.
-
या पोस्टमध्ये त्याने सुमीत राघवनला टॅग केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
-
सुमीत राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय केला. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय…कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी”, अशी कमेंट सुमीतने केली.
-
विशेष म्हणजे यात त्याने अमेय वाघला टॅग केले. त्यानंतरच यांच्या वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाली.
-
यानंतर अमेय वाघने “वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय” अशी खोचक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सुमीतला टॅग केले.
-
त्यावर उत्तर देताना सुमीत राघवन म्हणाला, “अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे…आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.”
-
“प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे”, असे म्हणते अमेयने सुमीतला स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिले.
-
त्यावर सुमीत राघवन म्हणाला, “एक असतो कॉन्फिडन्स, मग असतो ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग येतो अमेय वाघ…!”
-
यावर उत्तर देताना अमेय वाघने “कोण किती पाण्यात आहे ते बघूच ना उद्या संध्याकाळी !!! सुमीत राघवन आता #लागलीपैज” असे म्हटले आहे.
-
तर सुमीत राघवननेही त्याला प्रत्युत्तर देत “अमेय वाघ पाण्यात राहून माशाशी आणि इंडस्ट्रीमध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…बघू उद्या संध्याकाळी कोण वरचढ ठरतं…आता तर #लागलीपैज” असे म्हटले आहे.
-
दरम्यान अमेय वाघ आणि सुमीत राघवन यांच्यातील या फेसबुक वॉरची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
-
रविवारी दिवसभर सुरु असलेल्या या दोघांच्या फेसबुक पोस्टने आणि एकमेकांवरील टीकांमुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
हा वाद नेमका कशावरुन सुरु झाला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काहींना हा वाद म्हणजे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटत आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टखाली कमेंट करत ‘नवीन पिच्चर येतय ते सगळ्यांना कळलय’ असे लिहिले आहे.
-
तसेच अनेक जण सुमीत आणि अमेयमधील हा वाद फार पूर्वीचा आहे, असे सांगताना दिसत आहे.
-
मात्र आज (२६ सप्टेंबर) संध्याकाळी याचा निश्चितरित्या उलगडा होणार आहे. अमेयने केलेली ही पोस्ट वादातून आहे की यामागे काही प्रमोशन फंडा आहे? याचेही उत्तर लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”