Actor Vijay Varma gave a blunt reply to those who said you are not King Khan pns 97 | तू किंग खान नाहीस म्हणणाऱ्यांना अभिनेता विजय वर्माने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, "आता शाहरुखनेच.." | Loksatta

तू किंग खान नाहीस म्हणणाऱ्यांना अभिनेता विजय वर्माने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, “आता शाहरुखनेच..”

विजय वर्माने त्याच्या संघर्षाच्या दिवसांमधील एक किस्सा सांगितला.

तू किंग खान नाहीस म्हणणाऱ्यांना अभिनेता विजय वर्माने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, “आता शाहरुखनेच..”
विजय वर्माने शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितला.

अभिनेता विजय वर्माची मुख्य भूमिका असलेला ‘डार्लिंग्ज’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस या चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र होते. सध्या विजय वर्मा, आलिया भट्ट, शैफाली शाह या तिघांच्याही दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटात पुरुषांवरील हिंसाचार दाखवल्याप्रकरणी ‘डार्लिंग्ज’ बॉयकॉट करा अशी मागणी काही नेटीजन्सद्वारे करण्यात येत होती. त्यामुळे या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता प्रमोशन दरम्यान विजयने शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितला, जो चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना विजय वर्माने त्याच्या संघर्षाच्या दिवसातील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “१० वर्षांपूर्वी मी अभिनय करायचे ठरवून मुंबईत आलो. कुटुंबाला सोडून मी घरातून पळून आलो होतो. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली, अनेक गोष्टींची जोखीम घेतली. पण घरचे आता माझ्या कामामुळे समाधानी आहेत. त्यावेळी मला असे सांगण्यात आले होते की मुंबईत जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे सोप्पे नाही, तू शाहरुख खान नाहीस आणि आता शाहरुख खाननेच माझी ‘डार्लिंग्ज’ चित्रपटासाठी निवड केली आहे.”

आणखी वाचा – “तू लेखक नाहीस” म्हणत आमिर खानने दिला होता अतुल कुलकर्णींच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला नकार

विजयने अलीकडेच ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असुन, या चित्रपटातून करीना कपूर खान ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“तू कोणी सेलिब्रिटी नाही…”, सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल, नेटकऱ्याला म्हणाली…

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
“दोन दिवस मी पुण्यात…” अचानक लाइव्ह येण्यामागे संकर्षण कऱ्हाडेने दिलं कारण
“मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 3rd ODI: विराट कोहलीने शतक झळकावत रिकी पॉंटिंगचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत
चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “वाह रे पठ्ठ्या…”
‘हा’ लोकप्रिय भारतीय अभिनेता एलॉन मस्कच्या सहाय्याने घेणार अंतराळात झेप
सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” – उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला!