अभिनेता विजय वर्माने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलीय. विजयने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टवर अभिनेता इशान खट्टर तसचं अभिनेता आयुष्यमान खुरानाने कमेंट केली असून विजयची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

विजयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात त्याच्या हातात या फोटोत तो खुर्चीवर बसलेला दिसतोय. तर त्याच्या हातात एक गेमिंग कन्सोल आहे. कॅप्शनमध्ये तो म्हणालाय, ” हाय मित्रांनो…बाय मित्रांनो..भेटा माझ्या नव्या बायकोला PS5″ हातात गेमिंगचा कंट्रोल धरून विजयने मोठ हास्य करत फोटो शेअर केलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या हास्यावरून त्याला झालेला आनंद लक्षात येतोय.

विजयच्या या पोस्टवर अभिनेचा इशान खट्टरने कमेंट केलीय. तो म्हणालाय, “मी पळवून नेईन” तर अभिनेता आयुष्यमान खुराराने देखी कमेंट केली आहे. फायरचं इमोजी देते “ती हॉट आहे.” अशी कमेंट आयुष्यमाने केलीय.

नुकताच विजय राधिता आपटेसोबत ‘ओके कम्प्युटर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. येत्या काळात विजय लवकरच वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. लवकच तो आलिया भट्टसोबत ‘डार्लिंग’ सिनेमात झळकणार आहे.