घटस्फोटानंतर प्रेग्नेंसीवर केलेल्या वक्तव्यामुळे समांथा चर्चेत

समांथाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे वक्तव्य केले होते.

samantha ruth prabhu, naga chaitanya,
समांथाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे वक्तव्य केले होते.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून पती नागा चैतन्यसोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अशा चर्चा आहेत की तिला मुल नको होतं म्हणून तिने नागा चैतन्यशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तर असे म्हटले जाते की नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या खानदाला वारस हवा होता पण समांथा त्यासाठी तयार नव्हती आणि त्यासाठी तिने गर्भपात केला होता. पण समांथाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काही वेगळेच सांगितले आहे.

समांथाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आई होण्यावर आणि गर्भपातावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर समांथा म्हणाली, खरतरं स्त्रिया खूप शक्तिशाली असतात. जगात सगळ्यात वेदनादायी प्रक्रिया ही बाळाला जन्म देणे आहे. डिलिव्हरीच्या वेळी एका आईला वेदनादायी प्रक्रियेतून जावे लागते. पण शेवटी तिच आई आपल्या वेदनेला विसरूनला विसरून आपल्याला बाळाला पाहून हसते. तर समांथाच्या या वक्तव्यावरून असे वाटते की समांथाला आई होण्याशी कोणतीही हरकत नव्हती. पुढे ती म्हणाली की नागा चैतन्यने तिच्याशी याविषयी कधी चर्चा केली नाही.

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

समांथा आणि नागा चैतन्यने २ ऑक्टोबर २०२१ रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. समांथा आणि नागा चैतन्य हे ४ वर्ष वैवाहिक जीवनात होते. अचानक घटस्फोट घेतल्याची बातमी सांगितल्यानंतर समांथाला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

आणखी वाचा : काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली….

दरम्यान, समांथाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात आयटम सॉंगवर डान्स केला होता. याशिवाय विजय देवरकोंडा स्टार ‘लिगर’च्या निर्मात्यांनीही आयटम सॉंगसाठी समांथाशी संपर्क साधल्याचे म्हटले जात आहे. समांथाच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात ‘Kaathu Vaakula Rendu Kaadhal’, ‘शाकुंतलम’, ‘यशोदा’ हे तामिळ चित्रपट आणि ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटातून समांथा इंटरनेशनल डेब्यू करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After divorce with naga chaitanya samantha says pregnancy is a painful provess but at the end it is full of smile dcp

Next Story
वयाच्या ५८व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न, ३१ वर्षांनी लहान पत्नीविषयी म्हणाला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी