बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनी २००७ साली लग्नगाठ बांधली आणि आता त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन जरी त्यांचं वैयक्तिक आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवत असले, तरीही अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने तिच्या वैवाहिक आयुष्यामधल्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. ज्यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं, त्यानंतर दररोज त्यांच्यामध्ये भांडणं होत असत. यात अभिषेक बच्चनलाच माघार घेऊन हे भांडण संपवावं लागलं असल्याचं अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने सांगितलं. बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायचं हे वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेक रहस्ये उघड केली होती. यावेळी ऐश्वर्याला लग्नानंतर तिचं आणि अभिषेकची भांडणं झाली होती का ? असा सवाल करण्यात आला होता. यावर उत्तर देताना ऐश्वर्याने अगदी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. यावेळी उत्तर देताना अभिनेत्री ऐश्वर्या राय म्हणाली, “दररोज….” यापुढे पती अभिषेक बच्चनच्या बाजूने स्पष्टीकरण देत म्हणाली, “ती आमची भांडणं नसायची, केवळ मतभेद होते…इतक्या गंभीर स्वरूपाची भांडणं होत नव्हती. पण ही भांडणं झाली नसती तर आमचं पती-पत्नीचं नात खूपच फिकं वाटू लागलं असतं.”
अभिनेता अभिषेक बच्चन देखील यावेळी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना दिसला. यावेळी ऐश्वर्या राय बच्चनबद्दल बोलताना तो म्हणाला, “महिला कधी ऐकून घेत नाहीत…आमचा एक नियम असतो. भांडणं झाली की आम्ही झोपत नाहीत. अनकेदा तर आम्ही यासाठी एकमेकांची माफी मागितली कारण आम्हाला खूप झोप येत होती. आपण पुरूष मंडळींनी हे सारं जितक्या लवकर स्विकारू तितकं आपल्यासाठी हे चांगलं आहे.”
आणखी वाचा : शाहरुख खानचा मुलगा आर्यनने मित्रांसोबत केलेल्या पार्टीचे फोटोज व्हायरल
अभिषेक बच्चन पुढे मुलाखतीत म्हणाला, “तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचे नाही. तुमच्याकडे ठोस पुरावा नसला तरीही. पण महिलांच्या जगात या गोष्टींना काही फरक पडत नाही. ” लग्नाबद्दल सल्ला देताना अभिषेक म्हणाला, “लोक अनेकदा लग्नावरून वेगवेगळे विनोद करतात, पण प्रत्यक्षात खूप मजा येते.”
लग्नानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हनीमूनसाठी डिस्नेलँडला गेले होते. हनीमूनशी संबंधित अनुभव सांगताना अभिषेक म्हणाला होता, “तिथे जाऊन ती मिनी आणि मिकीसोबत पोज देत होती, त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होती.” हनीमून दरम्यान, ऐश्वर्या रायला फ्लाइट अटेंडंटने ‘मिसेस बच्चन’ म्हटले होते. त्यावर ती आणि अभिषेक हसायला लागले.