Latest Manoranjan News Updates 27 May 2025: अभिनेत्री आकांक्षा पुरीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी माहिती शेअर केली आहे. ३६ वर्षीय आकांक्षाने काही वर्षांपूर्वी बीजांड गोठवून घेतले. “मी बीजांड गोठवण्याचा (Eggs Freeze) निर्णय घेतला आणि ते केले, पण काही मुलींना याबद्दल कल्पनाच नाही,” असं आकांक्षा म्हणाली.

ती पुढे म्हणाली, “बीजांड गोठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. तुमची एक एएमएच पातळी असते, ज्यामुळे शरीरात बीजांड तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, त्यानंतर तुमचे शरीर अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ते तयार होणे थांबते. आता आपण अशा युगात आहोत जिथे बीजांड गोठवता येते, त्यामुळे मी ही प्रक्रिया करून घेतली. आणि मी त्याबद्दल आता उघडपणे बोलते.”

आकांक्षा म्हणाली, “जर मला भविष्यात आई व्हायचं असेल तर मी तयार असेन. मी ते करू शकत नाही असं नसेल. जर मला सिंगल मदर व्हायचं असेल तर तो पर्यायही माझ्यासाठी खुला असेल. आता मला कोणाचीही गरज नाही. मला कोणाची साथ लाभली नाही तर हरकत नाही, मी एकटीच बाळाला जन्म देऊ शकते.” या निर्णयासाठी आईने पाठिंबा दिल्याचंही आकांक्षाने सांगितलं.

Live Updates

Manoranjan Breaking News Updates

18:16 (IST) 27 May 2025

दिव्या दत्ताबरोबर किसिंग सीन करताना घाबरले होते इरफान खान, अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “आम्हाला वारंवार…”

Divya Dutta Irrfan Khan Film : दिग्दर्शिकेने मदत केल्याने सीन शूट करणं सोपं गेलं, दिव्या दत्ताने दिली माहिती …अधिक वाचा
18:15 (IST) 27 May 2025

बहुचर्चित ‘कुली’ चित्रपटाचं एकूण बजेट ३५० कोटी; एकटे रजनीकांत घेणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क…

बहुचर्चित ‘कुली’ चित्रपटाचं एकून बजेट ३५० कोटी, एकटे रजनीकांत घेणार तब्बल ‘इतकी’ रक्कम, जाणून घ्या… …सविस्तर वाचा
17:44 (IST) 27 May 2025

Video: तारा सोहमचे लग्न होणार, तर दुसरीकडे सावली सारंगला घटस्फोट देणार? मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

Savalyachi Janu Savali Serial: सारंग व सावली वेगळे होणार का? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट, पाहा …सविस्तर वाचा
17:39 (IST) 27 May 2025

८-९ किलोमीटर सायकल चालवली अन्…; ‘झी मराठी’च्या मालिकेचं वाराणसी येथे शूटिंग! अभिनेत्याने पत्नीसाठी घेतली खास भेट

“सुंदर घाट, गंगा नदी, वाराणसीमधील चविष्ट पदार्थ अन्…”, अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा अनुभव, ‘झी मराठी’च्या मालिकेचं वाराणसी येथे पार पडलं शूटिंग …अधिक वाचा
16:47 (IST) 27 May 2025

IIT मधून शिक्षण, मालिकेत केलं काम अन् मायक्रोसॉफ्टमध्ये मिळवली नोकरी; सगळं सोडून थेट IPS अधिकारी झाला वर्ध्याचा तरुण

IPS Abhay Daga Success Story: अभय डागाचे आई-वडील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत. …सविस्तर वाचा
16:27 (IST) 27 May 2025

क्रूझ, कॉमेडी अन् भयानक ट्विस्ट! Housefull 5 मध्ये झळकणार ‘हे’ २० कलाकार, नाना पाटेकरांच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष, पाहा ट्रेलर

Housefull 5 Trailer : Housefull 5 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! नाना पाटेकरांचा हटके लूक पाहिलात का? एकत्र झळकणार ‘हे’ २० कलाकार …सविस्तर वाचा
16:26 (IST) 27 May 2025

“मला एक नवीन कुटुंब मिळालं”, मालिका संपल्यानंतर ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीची पोस्ट; सहअभिनेत्रींच्या कमेंट्सने वेधले लक्ष

Navari Mitte Hitlerla Fame Actress Shares Photos: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले… …वाचा सविस्तर
15:58 (IST) 27 May 2025

Cannes मधील लूकवरुन ऐश्वर्या रायशी तुलना करणाऱ्यांना उर्वशी रौतेला म्हणाली…

Cannes २०२५ मधील लूकमुळे उर्वशी रौतेलाची ऐश्वर्या रायशी तुलना, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली… …अधिक वाचा
15:49 (IST) 27 May 2025

सलमान खानला करायचं होतं लग्न, पण ऐश्वर्या राय…; दोघांच्या नात्याबद्दल ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा

Salman Khan Aishwarya Rai Breakup Reason : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड्समुळे ऐश्वर्या रायचे आई-वडील होते नाराज …सविस्तर वाचा
15:26 (IST) 27 May 2025

“त्यांना मी मम्मी म्हणायचो…” अमित कुमार यांनी सांगितला सावत्र आई मधुबालाबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, “एकदा त्यांनी…”

अमित कुमार यांनी सांगितला वडील किशोर कुमार व सावत्र आई मधुबालाबद्दलचा ‘तो’ किस्सा म्हणाले, “मी त्यांना…” …वाचा सविस्तर
14:54 (IST) 27 May 2025

“शाहरुख व माझ्यात तणावपूर्ण…”, किंग खानबाबत जुही चावलाचे वक्तव्य; म्हणाली, “आधी आम्ही सेटवर एकत्र…”

Juhi Chawla on Shah Rukh Khan: “माझी मुले रडत असत…”, जुही चावला म्हणालेली… …वाचा सविस्तर
14:46 (IST) 27 May 2025

बंटी और बबलीसाठी हृतिक रोशन होता निर्मात्यांची पहिली पसंती

‘बंटी और बबली’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत. अभिषेक बच्चन व राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमासाठी हृतिक रोशन निर्मात्यांची पहिली पसंती होता, त्याने हा चित्रपट करावा अशी त्याचे वडील राकेश रोशन यांचीही इच्छा होती. मात्र हृतिकला त्यावेळी एका लहान शहरात राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका करायची नव्हती, त्यामुळे त्याने नकार दिला, अशी माहिती दिग्दर्शक शाद अली यांनी दिली.

14:38 (IST) 27 May 2025

“दुसऱ्या अभिनेत्याचं कौतुक केल्याने शिवीगाळ अन् मारहाण केली”, सुपरस्टारवर मॅनेजरचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

“चित्रपट फ्लॉप झाल्याने निराश झालाय”, मारहाण करणाऱ्या स्टारबद्दल स्पष्टच बोलला मॅनेजर …सविस्तर वाचा
14:22 (IST) 27 May 2025

प्रेमासाठी सर्वकाही…! पारूच्या वडिलांचं ‘ते’ खडतर व्रत आदित्य पूर्ण करणार…; मालिकेत होणार अग्निपरीक्षा, पाहा प्रोमो…

Paaru : ‘पारू’साठी आदित्य देणार अग्निपरीक्षा, मारुतीचं व्रत पूर्ण करणार…; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो… …सविस्तर बातमी
13:33 (IST) 27 May 2025

“हिंमतही करू शकणार नाहीत”, ‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या रिमेकवर मूळ गायकाची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले…

‘चुनरी चुनरी’ गाण्याचा पुन्हा रिमेक, मूळ गायक प्रतिक्रिया देत म्हणाले… …सविस्तर वाचा
13:28 (IST) 27 May 2025

Video: ५५ वर्षीय गायिकेने परफॉर्मन्सदरम्यान बॅकग्राउंड डान्सरबरोबर केले लिपलॉक; नेटकरी म्हणाले…

Jennifer Lopez Gets Intimate With Her Dancers: गायिकेचा चार वेळा झाला आहे घटस्फोट; जेनिफर लोपेजच्या ‘त्या’ कृतीने वेधले लक्ष …सविस्तर वाचा
13:09 (IST) 27 May 2025

“फ्लर्ट करायची इच्छा…”, अभिनेत्याचे अश्लील मेसेज, मराठी इंडस्ट्रीतून प्राची पिसाटला पाठिंबा, कलाकार म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेत्याचे प्राची पिसाटला मेसेज, अभिनेत्रीने थेट शेअर केले स्क्रीनशॉट, मराठी कलाकारांकडून प्राचीला पाठिंबा… …वाचा सविस्तर
13:07 (IST) 27 May 2025

आलिया भट्टला ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबर करायचं आहे काम; कौतुक करीत म्हणाली, “तो एक उत्तम नट…”

आलिया भट्टला पडली ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याच्या कामाची भुरळ, कौतुक करत व्यक्त केली काम करण्याची ईच्छा …अधिक वाचा
12:59 (IST) 27 May 2025

“बाईच्या जातीनं घरातच जगायचं आणि घरातच…”, डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर येणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ट्विस्ट

Lakhat Ek Aamcha Dada upcoming twist: सूर्याचा डॅडींना रुद्रावतार दाखवणार; मालिकेचा प्रोमो पाहिलात का? …सविस्तर वाचा
12:41 (IST) 27 May 2025

Video: दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटलं, तरीही इम्रान हाश्मीला किस करत होती बॉलीवूड अभिनेत्री; म्हणालेली, “त्यासाठी मी जास्त…”

Emraan Hashmi Viral Video: “किसिंग सीन देताना इम्रानने…”, काय म्हणाली होती अभिनेत्री? …वाचा सविस्तर
12:26 (IST) 27 May 2025

“माझ्याबद्दलचे तर्क-वितर्क…”, युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर अखेर धनश्री वर्माने सोडलं मौन, म्हणाली…

युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर धनश्री वर्माने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याबद्दलचे गैरसमज…” …अधिक वाचा
11:51 (IST) 27 May 2025

एक नंबर, तुझी कंबर…; ट्रेंडिंग गाणं ऐकू येताच ‘हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अन् निखिल बनेने केलं असं काही…; व्हिडीओ एकदा पाहाच…

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अन् निखिल बनेचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस… …सविस्तर बातमी
11:24 (IST) 27 May 2025

४० कोटींचे बजेट, कमावले तब्बल १५४ कोटी, सात वर्षांपूर्वीचा ‘हा’ सिनेमा OTTवर आहे ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलात का?

या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला असून त्याने २०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. …वाचा सविस्तर
11:21 (IST) 27 May 2025

अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर झालेले गंभीर आरोप; बॉलीवूड अभिनेता म्हणाला, “मला स्वत:चा अभिमान वाटतो की…”

Bollywood Actor on Legal Ordeal: “अजय देवगणचे करिअर…”, बॉलीवूड अभिनेता नेमकं काय म्हणाला? …सविस्तर वाचा
11:16 (IST) 27 May 2025

पांढरी बनियान, जाड भिंगाचा चष्मा अन्…, ‘हेरा फेरी’तील परेश रावल यांची भूमिका ‘या’ व्यक्तीपासून प्रेरित, अभिनेत्याचा खुलासा

‘हेरा फेरी’मधील परेश रावल यांच्या भूमिकेमागचा ‘तो’ किस्सा माहित आहे का? कोण आहेत खऱ्या आयुष्यातील बाबुराव आपटे? जाणून घ्या… …सविस्तर वाचा
11:12 (IST) 27 May 2025

लग्नाच्या सात वर्षांनी प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा बांधली लग्नगाठ, नोंदणी पद्धतीने केला विवाह, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

प्रसिद्ध टेलीव्हिजन जोडप्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, आता पुन्हा झाले साताजन्माचे साथी, व्हिडीओ समोर …सविस्तर वाचा
10:42 (IST) 27 May 2025

सायलीचे सासरेबुवा Rocks! खोटारड्या प्रियाला ‘अशी’ घडवली अद्दल, चेपावे लागणार पाय; पाहा मालिकेचा जबरदस्त प्रोमो

ठरलं तर मग : प्रताप सुभेदारांनी घेतली सायलीची बाजू, प्रियाला घडवणार अद्दल, मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो …सविस्तर वाचा
09:34 (IST) 27 May 2025

“मी एक शब्दही बोलणार नाही, मला…”; रेखा यांना शेवटचं काय म्हणाले होते अमिताभ बच्चन? नंतर कधीच…

Rekha Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम न करता येणं हे सर्वात मोठं नुकसान असल्याचं रेखा म्हणाल्या होत्या. …अधिक वाचा

अभिनेत्री आकांक्षा पुरी (फोटो – इन्स्टाग्राम)

आकांक्षा पुरीने सांगितलं की बीजांड गोठवण्याच्या तिच्या निर्णयाला आईने पाठिंबा दिला.