अभिनेता अक्षय कुमारला आपण अनेक भूमिकांमध्ये पाहिलं असेल पण वडिलांच्या भूमिकेत त्याला पाहायला मिळणं दुर्मिळच. पण सोशल मीडियामुळे हेही शक्य झालं आहे. नुकतंच अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अक्षय सध्या मालदिवमध्ये आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.

एका वॉटर राईडदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यात दिसत आहे की,अक्षय ही राईड घेत आहे मात्र, त्या दरम्यान त्याला बॅलन्स करता येत नाही. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय म्हणतो, “आज सुट्टीचा शेवटचा दिवस. पहा कोणी आपल्या आवडीच्या फ्लोटवरुन मला हे करायला लावलं आहे आणि स्वतः मात्र मजा घेत आहे.” या कॅप्शनमध्ये अक्षयने आपली मुलगी निताराचा उल्लेख केला नाही पण ही निताराच असणार हे कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे.

मोठमोठे स्टंट्स करणारा अक्षय कुमार आपल्या मुलीच्या इच्छेसाठी धडपडत हा स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तिचं मोठ्याने हसणंही ऐकू येत आहे.
या व्हिडिओत अक्षयच्या फॅन्सना अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्याच्या पाठीवरचा टॅटू. अक्षयचा मोठा मुलगा आरव याच्या नावाचा हा टॅटू आहे. अक्षय आणि त्याची फॅमिली सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.