रणबीर कपूरसोबत लग्न करुन आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरु करणारी आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. याशिवाय ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या निमित्तानेही आलिया चर्चेत आहे. रणबीर आणि आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. तसंच ‘डार्लिग’ चित्रपटाच्या निमित्ताने आलिया प्रथमच निर्मातीच्या भूमिकेतही दिसणार आहे.
आपले आगामी चित्रपट, हॉलिवूडमधील पदार्पण यासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आज आलिया इंडियन एक्स्प्रेसच्या अड्डामध्ये देणार आहे. एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांच्यासोबत आलिया भट्टसोबत गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता लोकसत्ता.डॉट कॉमच्या ‘लोकसत्ता लाईव्ह’ या युट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर तुम्ही हा अड्डा लाईव्ह पाहू शकता.