अभिनेता रणवीर सिंग हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता रणवीर सिंग हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी प्रेग्नेंसीची गोड बातमी दिल्यानंतर ती कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आलियाने डार्लिंग या तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याची तिने फार हटके पद्धतीने उत्तरं दिली.
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी…”
यावेळी आलियाला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल विचारण्यात आले. रणवीर सिंगने नुकतंच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, मी माझा आवडत्या सहकलाकार रणवीर सिंगबद्दल कोणतीही नकारात्मक चर्चा सहन करु शकत नाही. त्यामुळे मी हा प्रश्नदेखील सहन करु शकत नाही. आलियाचे हे उत्तर ऐकून तिचे चाहते चकित झाले आहेत.
दरम्यान रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली “आपल्या देशात…”
रणवीरच्या या लूकवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. रणवीरने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केलं आहे. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.