तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज हैदराबाद येथील घरातून पोलिसांनी अटक केली. ‘पुष्पा 2’ च्या प्रिमिअरला चेंगराचेंगरी झाली होती. त्या घटनेत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती. आज त्याला नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. सुनावणीनंतर हायकोर्टाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे.
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले…
आज (१३ डिसेंबर रोजी) नाना पाटेकर त्यांच्या आगामी ‘वनवास’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेले होते. तिथे त्यांना अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत विचारण्यात आलं. “जर माझ्यामुळे एखादी घटना घडत असेल आणि कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर मला अटक व्हायला पाहिजे. पण माझी चूक नसेल तर मला अटक होऊ नये,” असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं.
राणा दग्गुबाती पोहोचला अल्लू अर्जुनच्या घरी
अल्लू अर्जुनचा जवळचा मित्र राणा दग्गुबाती हा अभिनेत्याच्या घरी भेटीसाठी गेला.
#RanaDaggubati reached #AlluArjun house.@RanaDaggubati pic.twitter.com/5W8gjB6EFa
— ??????????? (@UrsVamsiShekar) December 13, 2024
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया
अजेंडा आजतक २०२४ मध्ये कंगना राणौत यांनी अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या. “मी अल्लू अर्जुनची खूप मोठी समर्थक आहे. पण तुम्हाला एक उदाहरण घालून द्यावंच लागेल. आम्ही हाय-प्रोफाइल लोक आहोत, याचा अर्थ आमच्यावर कोणतेही परिणाम होऊ नयेत, असं नाही. लोकांचे जीव खूप मौल्यवान आहेत,” असं त्या म्हणाल्या.
उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच अभिनेत्याला ५० हजार रुपयांचा पर्सनल बाँड सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अल्लू अर्जुनच्या अटकेवर रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया
अल्लू अर्जुनच्या अटकेवर रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे. “आता मी जे पाहतेय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये”, असं रश्मिका म्हणाली.
अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर
हायकोर्टाने मृत महिलेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत अटक करण्यात आलेल्या लोकांना याप्रकरणी दोषी धरता येईल का, असा सवाल केला आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला.
चेंगराचेंगरी प्रकरणात अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनला हैदराबाद मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं.
https://x.com/ANI/status/1867541052619731294