अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ साली मद्रास तमिळनाडूमध्ये झाला आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात २००१ साली ‘गंगोत्री’ चित्रपटातून केली. त्याचा हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. मात्र त्याआधी १९८५-८६ साली त्यानं बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अल्लू अर्जुन विवाहित असून त्यानं २०११ साली गर्लफ्रेंड स्नेहा रेड्डीशी लग्न केलं होतं. या दोघांनी दोन मुलं देखील आहेत. दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अल्लू अर्जुन एक उत्तम डान्सर देखील आहे. आपल्या दर्जेदार अभिनयासाठी अल्लू अर्जुननं बरेच पुरस्कार जिंकले आहेत.Read More
अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे महिलेच्या पतीने माध्यमांना सांगितले.