दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये आता अभिनेता श्रेयस तळपदेचा समावेश आहे. श्रेयसने श्रीवल्ली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
श्रेयस तळपदे लवकरच ‘आपडी थापडी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात संदीप पाठक हा अभिनेता दिसणार आहे. संदीपने श्रेयससोबत शूटिंग दरम्यान ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
आणखी वाचा : अल्लू अर्जुनने वाहिली पुनीत राजकुमारला श्रद्धांजली
संदीपने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. ‘मी सध्या कोकणात श्रेयस तळपदेसोबत आपडीथापडी चित्रपटाचे शुटींग करतोय. पुष्पा चित्रपटात त्याने अल्लू अर्जुनला जो आवाज दिला आहे तो कमाल आहे. ती फिल्म हिदींत हीट होण्यामागे श्रेयसचं खूप मोठं Contribution आहे. तो सेटवर असताना पुष्पाच्या गाण्यावर रील करायचा मोह कुणाला नाही होणार, मलासुध्दा झाला..’ असे कॅप्शन संदीपने व्हिडीओ दिला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. यामधील हिंदी चित्रपटाला अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हिंदी भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
