प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. तुम्ही जर कलाकार असाल तर तुम्हाला प्रसिद्धी बरोबरच ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. बरेच कलाकार सोशल मीडियावर छोट्या छोट्या कारणांनी ट्रोल होत असतात. काही कलाकार त्यांना सडेतोड उत्तर देतात, तर काही न बोलून आपल्या कृतीतून आपला राग व्यक्त करतात. तर काही लोक सरळं सोशल मीडियाकडे पाठ फिरवतात. असंच काहीस ‘बीग बॉस १४’ फेम अभिनेता अली गोनी सोबत झालं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अली गोनी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या कामा बद्दल, दैनंदिन आयुष्यबद्दल आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. मात्र आता अली सोशल मीडियावरून अदृश्य होणार आहे. त्याने ट्विटर पासून काही काळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अली आपल्या चाहत्यांन सोबत अनेक गोष्टी शेअर करत असतो. अगदी आपल्या खासगी आयुष्याबद्दल पण तो आपल्या चाहत्यांना सांगताना दिसतो. पण आता ट्विटर पासून लांब राहणार असल्याचे त्याने ट्विट करून नेटकाऱ्यांना सांगितले. तो ट्विटमध्ये म्हणाला की “मी पाहिलं की काही अकाऊंटवर माझ्या बहिणीबद्दल वाईट बोललं जात आहे, मी आधी खूप दुर्लक्ष केले, पण आता बास या पुढे मी दुर्लक्ष करू शकत नाही…माझ्या कुटुंबियांना बोलायची काहीच गरज नव्हती…मला आत्ता एवढा राग आला आहे की मी हे अकाऊंट बंद करेन. कारण मला माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी नको आहे.

यानंतर अलीने आणखी एक ट्विट केलं त्यात तो म्हणाला “मी ट्विटर पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सगळ्या फॅन्सना भरपूर प्रेम.


दरम्यान अली गोनी बीग बॉसमधील चर्चित सदस्य होता, जरी तो ‘बीग बॉस १४’ चा विजेता ठरला नसला तरी लाखो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी झाला होता.