Amitabh Bachchan shares his experience of being nervous on the sets of Kaun Banega karodpati pns 97 | "तेव्हा माझे हात, पाय कापतात..." अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव | Loksatta

“…तेव्हा माझे हात, पाय थरथरतात” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

“…तेव्हा माझे हात, पाय थरथरतात” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव
अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती १४’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. येत्या ७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अनेक नामवंत मंडळी कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत.

गेल्या २२ वर्षांपासून अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. या वयात देखील त्यांचा कामाप्रती उत्साह थक्क करणारा आहे. या कार्यक्रमाबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना त्यांनी कार्यक्रमाशी निगडीत अनेक गोष्टींवर भाष्य केले. विशेषतः त्यांना या कार्यक्रमाकडे कोणती गोष्ट आकर्षित करते याबद्दल त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’ करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली होती एक अट, म्हणाले “हा कार्यक्रम”

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “जे लोक या सेटवर येतात, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. ते ज्याप्रकारे माझं स्वागत करतात, त्यांचं ते प्रेम मला कार्यक्रमात पुन्हा येण्यास भाग पाडते.

यानंतर ‘कार्यक्रमासाठी तुम्ही तयारी कशी करता?’ या प्रश्नावर ते म्हणाले, “तो अनुभव वेगळाच असतो. प्रत्येक वेळी सेटवर गेल्यानंतर मला भीती वाटते. माझे हात, पाय थरथरतात. मी हे करू शकेन की नाही याबाबत मला शंका वाटते. मी हे कसे करू शकतो याबाबत मी रोज विचार करतो. पण मी जेव्हा स्पर्धकांना पाहतो तेव्हा मला प्रेरणा मिळते. सेटवर आल्यावर सर्वात आधी मी त्यांचे आभार मानतो, कारण ते ज्याप्रकारे या कार्यक्रमावर प्रेम करतात, कार्यक्रमात स्वारस्य दाखवतात त्यामुळे हा शो आहे, त्यांच्यामुळे मी हे करू शकतो.”

आणखी वाचा – KBC 14 : न्यूज चॅनलनंतर आता बिग बींच्या निशाण्यावर Whatsapp युनिव्हर्सिटी, नवा प्रोमो व्हायरल

त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या टीमचे देखील आभार मानले. “त्यांच्या परिश्रमामुळे सर्वजण एकत्र येतात” असे ते म्हणाले. “सध्याच्या काळात जिथे सर्वजण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात आहेत, तिथे हा कार्यक्रम सर्वांना एकत्र आणण्याचे काम करत आहे.” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Exclusive Video : ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार आहेस का? सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझा विचार…”

संबंधित बातम्या

‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिर खानने मागितली ‘एवढी’ रक्कम, पण नेटफ्लिक्सने दिला स्पष्ट नकार
अस्सल देशी विनोदांनी खचाखच भरलेल्या ‘डेडपूल 2’चा ट्रेलर पाहिलात का?
आर्ची-परशासह नागराज मंजुळे झाले ‘सैराट’, ‘मनचिसे’त प्रवेश
Birthday Special : या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा
“त्याने पँटची चेन उघडली आणि..,” गंगाने सांगितला धक्कादायक अनुभव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच