उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. टी सीरिजच्या मूड बना लिया या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले. या गाण्यात अमृता यांच्या डान्सची झलकही पाहायला मिळाली. परंतु, या गाण्यातील लूकमुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता त्यांच्या नवीन गाण्यात पार्टी लूकमध्ये दिसून आल्या. त्यांच्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. ट्रोल करणाऱ्यांना अमृता यांनी उत्तरही दिलं होतं. आता त्यांनी त्यांच्याच या नवीन गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अमृता यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> मिठी मारली, किसं केलं अन्…; अनुपमा-अनुजचा इंटिमेट होतानाचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Bigg Boss 16: साजिदला पाहताच फराह खान भावूक; शिव ठाकरेला मिठी मारत म्हणाली “तू माझा…”

‘मूड बना लिया’ या गाण्यावरील रील व्हिडीओसाठी अमृता यांनी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास वेस्टर्न लूक केला आहे. या गाण्याच्या हूक स्टेप त्या व्हिडीओत करताना दिसत आहेत. “मूड बना लिया गाण्याच्या हूक स्टेप्सवर रील व्हिडीओ बनवा आणि आम्हाला टॅग करा”, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा>> “माझी राजकीय पार्श्वभूमी असल्याने…”, गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली ‘ती’ गोष्ट

अमृता फडणवीस पेशाने बॅंकर असून गायिकाही आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच नवीन गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis reel video on mood banaleya goes viral kak