अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या लग्नाला जवळपास ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांना ‘वीर’ नावाचा मुलगा आहे. अमृताने सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेतला असून ती मुलासोबत वेळ घालवताना दिसते.
अमृताचा पती आरजे अनमोलने नुकताच त्यांच्या चिमुकल्या मुलाचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत वीरचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी या फोटोने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो शेअर करत अनमोलने मजेदार कॅप्शन दिलंय. त्याच्या या कॅप्शनमुळे ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
अनमोल ने शेअर केलेला फोटो कारमधील आहे. यात वीर अमृताच्या मांडीवर असल्याचं दिसतोय. तर तो कॅमेराच्या दिशेने रोखून बघतोय हे जाणवतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनमोल म्हणाला, ” जेव्हा मी ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून असतं. कोई बताएगा, यहाँ बाप कौन है ?” असं मजेशीर कॅप्शन त्याने दिलंय.
अनमोलने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. बाळ खूप क्यूट असल्याचं अनेक चाहत्यांनी म्हंटलं आहे. तर अनमोलच्या कॅप्शनमुळे देखील चाहत्यांनी या पोस्टला पसंती दिली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमृता आई झाली. सोशल मीडियावरुन अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. 2002 सालात आलेल्या ‘अब के बरस’ या सिनेमातून अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर इश्क विश्क, मै हूं ना,विवाह, हे बेबी अशा सिनेमांमधून ती झळकली. सध्या अमृताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे.