‘गहराइयां’ प्रमोशनसाठी घातलेल्या कपड्यांमुळे अनन्या पांडे पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले…

गहराइयां चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी घातलेल्या ड्रेसमुळे अनन्या पांडे ट्रोल झाली आहे.

ananya panday, ananya panday trolled, gehraiyaan, gehraiyaan promotion, deepika padukone, siddhant chaturvedi, गहराइयां, अनन्या पांडे, अनन्या पांडे ट्रोल, दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी
मुंबईत झालेल्या प्रमोशनच्या वेळी घातलेल्या कपड्यांमुळे सध्या अनन्या पांडेला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या हे सर्वच कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. पण मुंबईत झालेल्या प्रमोशनच्या वेळी घातलेल्या कपड्यांमुळे सध्या अनन्या पांडेला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

नुकतंच मुंबईत झालेल्या प्रमोशनच्या वेळी दीपिका, सिद्धांत आणि अनन्या यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. पण त्यावेळी गार हवेमुळे अनन्या पांडेला थंडी लागत होती. त्यावेळी सिद्धांतनं तिला स्वतःचं जॅकेट दिलं. या प्रमोशनला अनन्यानं मरून रंगाचा ब्रालेट टॉप आणि त्यासोबत ऑफ व्हाइट फ्लोरल प्रिंटेड पॅन्ट घातली होती. पण या कपड्यांमुळे तिला थंडी लागत होती. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र अनन्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली.

‘गहराइयां’ प्रमोशनचा एक व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘एवढी थंडी आहे हे माहीत असताना अशा कपड्यांमध्ये बाहेर येण्याची गरजच काय?’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘थंडीत जीव गेला तरी चालेल पण हे लोक फॅशन काही सोडणार नाहीत.’ तर आणखी एका युजरनं लिहिलं, ‘अजून हवा हवाई होऊन फिरत राहा.’ या शिवाय इतरही अनेक युजर्सनी अनन्याला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं आहे.

दरम्यान अशाप्रकारे कपड्यांवरून ट्रोल होण्याची अनन्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिला कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शननं केलं आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ananya panday got trolled for her dress during promotion of gehraiyaan mrj

Next Story
…अन् अभिनेत्रीने वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी