बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता अजुनही कमी झालेली नाही. अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकताच अनिल कपूर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मास्क न घालता मोकळ्या गार्डनमध्ये गेल्यावर किती छान वाटतं हे अनिल कपूर यांनी सांगितलं आहे.

अनिल सध्या जर्मनीत आहेत. तिथला हा व्हिडीओ अनिल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल एका गार्डनमध्ये असल्याचे दिसत आहेत. तिथे काही लोक गाणी गात बॅंड वाजवत आहेत. हे पाहून अनिल यांना रहावलं नाही आणि ते नाचू लागतात.

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

मास्कशिवाय मोकळ्या हवेत श्वास घेण्यात किती आनंद मिळतो हे अनिल यांनी हा व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘म्यूनिचमधील एका पार्कमध्ये मास्क फ्री झोनमध्ये डान्स करण्यासाठी संगीत पुरेसे होते…संपूर्ण जगाचे लवकरात लवकर पूर्ण लसीकरण व्हावे आणि आपण पुन्हा एकदा सामान्य जीवन जगू याची प्रार्थना करतो’, असे कॅप्शन अनिल यांनी दिले आहे. अनिल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

अनिल हे काही दिवसांपूर्वी त्यांची धाकटी लेक रियाच्या लग्नामुळे चर्चेत होते. अनिल ६४ वर्षांचे असून ही फिट अभिनेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान, गेल्या वर्षी अनिल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एके वर्सेस एके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत दिसला होता.