रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ सीजन ११ च्या पहिल्या एपिसोडसाठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या मेकर्सनी नव नवे प्रोमो रिलीज करण्यास सुरवात केलीय. आता हा शो प्रेक्षकांसाठी किती थ्रिलर आणि सस्पेन्स घेऊन येणार आहे, हे पहिल्या एपिसोडमध्ये कळणार आहे. या शोचा नवा प्रोमो आता रिलीज करण्यात आलाय.

मी काय बकरा आहे का ?

या प्रोमोमध्ये अनुष्का सेन तिच्या मोबाईलवर लाईव्ह सेशन करताना दाखवण्यात आलीय. या लाईव्ह सेशनमध्ये अनुष्का सेन तिच्या फॅन्सना होस्ट रोहित शेट्टीची ओळख करून देते. अनुष्का रोहित शेट्टीला म्हणते, “सर तुम्ही माझ्या फॅन्सना हाय करू शकता का? हा माझा व्लॉग सुरूये…त्यानंतर अनुष्का सेन रोहित शेट्टीला म्हणते, सर तुम्ही खूपच G.O.A.T. आहात…अनुष्काचा हा टर्म ऐकून रोहित शेट्टी चक्रावून जातो. कारण रोहित शेट्टीला G.O.A.T. चा अर्थ माहित नसतो. रोहित शेट्टी म्हणतो, काय, मी काय बकरा वाटतो का तुम्हाला? त्यानंतर अनुष्का सेन रोहित शेट्टीला G.O.A.T. चा फुल फॉर्म सांगते आणि म्हणते तुम्ही ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहात.”

अनुष्का सेन इतकी मस्ती करत असताना रोहित शेट्टी तरी कसा मागे राहील. तो सुद्धा तिच्या टक्करची मस्ती करू लागतो. रोहित शेट्टी अनुष्का सेनला म्हणतो, “आता तुझ्यासोबत काय होणारेय माहितेय का? E.G.A…..एक्स्ट्रीम घोर अत्याचार”. या व्हिडीओमध्ये अनुष्का सेन एका विषारी कोळीसोबत देवदास मुमेंट रीक्रिएट करताना दिसून आली. यात अनुष्का सेनने आपल्या हातावर विषारी कोळी ठेवून देवदाव चित्रपटातलं सुपरहिट सॉंग ‘सिलसिला ये चाहत का…’ हे गाणं अगदी घाबरत घाबरत गाताना दिसून आली.

खतरों के खिलाडी सीजन ११ मध्ये टीव्ही क्षेत्रातील बडे कलाकार झळकणार आहेत. यात निक्की तंबोळी, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, वरुण सूड, राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी, सौरभ राज जैन, विशाल आदित्य सिंह सारखे कलाकार स्टंट करताना दिसून येणार आहेत. खतरों के खिलाडी सीजन १० चा खिताब करिश्मा तन्नाने आपल्या नावे केला होता. आता नव्याने येणारा सीजन ११ कोण आपल्या नावे करतंय, हे पाहणं रंजकदार असणार आहे.