Arbaaz Khan Daughter Makes First Public Appearance : अरबाज खान नुकताच बाबा झाला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान हिने रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. लेकीच्या आगमनाने खान कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आता शुरा खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अरबाज आणि शुरा रुग्णालयातून घरी जातानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज त्याच्या मुलीला हातात घेऊन कारमध्ये बसताना दिसतोय, तर शुरा बुरखा घालून रुग्णालयातून घरी जाताना दिसत आहे.

अरबाज खान, त्याची पत्नी शुरा खान आणि त्यांच्या मुलीसह रुग्णालयातून घरी पोहोचला. काळ्या टी-शर्ट आणि पांढऱ्या पँटमध्ये तो खूपच छान दिसत होता. तो त्याच्या मुलीला हातात घेऊन गाडीत बसलेला दिसला. त्याने पापाराझींनी अभिनंदन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान, शुरा खान काळा बुरखा घालून पुढच्या सीटवर बसलेली दिसली, तर अरबाज त्याच्या मुलीसह मागच्या सीटवर बसला.

दरम्यान, शुरा खानला शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी हिंदुजा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिच्याबरोबर अरबाज खान रुग्णालयात होता. तसेच शुराची आई व तिची मोठी लेकदेखील रुग्णालयात पोहोचले होते. त्यांचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

एकीकडे चाहते अरबाज खान आणि शुरा खान यांना मुलीचे पालक झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत; तर दुसरीकडे शुराला बुरखा घातलेले पाहून प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका नेटकऱ्याने विचारले, “ती बुरखा का घालतेय?” काही नेटकऱ्यांना शुराला तिच्या बुरख्यात ओळखताही येत नाही. एका व्यक्तीने कमेंट केली, “बुरख्यात कोण आहे?”

भावाच्या लेकीला भेटायला सलमान खान रुग्णालयात पोहोचला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अरबाज खानचा मोठा भाऊ सलमान खानने शुरा खान व तिच्या मुलीची हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली होती. अरबाजच्या लेकीची भेट घेऊन तो रुग्णालयातून बाहेर आला, तेव्हाचे त्याचे व्हिडीओ पापाराझींनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि ते खूप व्हायरल झाले आहेत.