टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या देशाचे नाव उंच करणाऱ्या नीरज चोप्राने देशाचे नाव उंच केले आहे. त्याच्या विजयानंतर संपूर्ण भारत देश त्याचे अभिनंदन केले. आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने देखील त्याचे अभिनंदन केले आहे. नीरजने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये १२१ वर्षांनंतर आपल्याला सुवर्णपदक मिळाल्याने तो चर्चेत आहे. मात्र, अर्जुन नीरजने केलेल्या मेहनतीकडे पाहून प्रभावी झाला आहे.
१२ वर्षांचा असताना नीरजचे वजन हे ९० किलो होते. लठ्ठपणाचा सामना केल्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि त्याने या सगळ्या गोष्टींना पाठी टाकत आज भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. अर्जुन हा नीरजच्या विजयामुळे आणि त्याचं वजन कमी करण्याचा प्रवास पाहता आनंदी झाला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीरजचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “लठ्ठपणाशी लढणे म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण थकतो. नीरज चोप्राने केवळ लठ्ठपणावर मात केली नाही, तर देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरज, तू माझ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहेस,” असे कॅप्शन अर्जुनने दिले आहे. अर्जुनची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : ‘दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध आणि…’, नर्गिस फाखरीने केला धक्कादायक खुलासा
दरम्यान, अर्जुन हा देखील लहान असताना लठ्ठ होता. अर्जुनचे वजन १५० किलोच्या आसपास होते. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्या आधी अर्जुनने खूप मेहनत केली आणि त्याचे वजन कमी केले. अर्जुनने नाही तर आणखी बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधी वजन कमी केले आहे.